राज्यात दोन दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. पावसाचे हे थैमान सुरूच राहणार आहे. कारण भारतीय हवामान विभागाने पुढचे तीन दिवस राज्यभरात विविध ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे.
तसेच ‘मिचांग’ हे चक्रीवादळही तीव्र होणार आहे. या वादळाचा परिणाम म्हणून मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात हळूहळू ते कमी दाबाच्या पट्टय़ात रूपांतरित होऊन पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
2 डिसेंबरपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात ‘मिचांग’ चक्रीवादळ निर्माण होईल आणि अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
