अन् अचानक साकूर परिसरातील रस्ते झाले दिसेनासे….

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकुर परिसरात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सकाळी अचानक दाट धूके पसरल्याने साकुरकरांना हरवल्याची प्रचिती आली. गेल्या काही दिवसापासून वारंवार होणाऱ्या बदलत्या वातारण तसेच अवकाळी पावसामुळे साकुर पठारभागातील शेत पिके धोक्यात आली आहे.

तसेच नैसर्गिक परिस्थितीपुढे पठारभागातील शेतकरी हतबल झाला आहे. परिसरात अचानक शुक्रवारी सकाळपासून दाट धूके पसरले होते. परिसरात अतिशय दाट धूके पसरल्याने रस्त्यावरील समोरील वाहनेही दिसत नाही. वाहनचालक वाहनांची लाईट लावूनच वाहन चालवत असल्याचे दिसत आहे.

तसेच रस्तेही धूक्यात हरवल्याने दिसेनासे झाले होते. तर या धूक्यामुळे रब्बी हंगामातील परिसरातील कांदा, गहू , हरभरा या पिकांबरोबर फळबागांना देखील अधिक फटका बसणार आहे. या वातावरणामुळे पिकांवर लगेचच औषध फवारणी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने धूमाकूळ घातला आहे. त्यामुळे या वातावरणामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.

Leave a Comment