काँग्रेसला मोठा धक्का ; ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

अहमदनगर : काँग्रेसला (Congress) आज भाजपकडून आणखी एक धक्का बसला आहे. गेल्या 30 वर्षांपासून काँग्रेसचा निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वात कर्जत-जामखेडमध्ये हा पक्षप्रवेश झाला. काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसमध्ये एकिकडे नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी दबक्या आवाजात सुरु आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रवीण घुले यांनी भाजपात प्रवेश केल्याने या ठिकाणी आता महाविकास आघाडीसमोरील आव्हानं आणखी वाढण्याची चिन्ह आहेत.

Leave a Comment