मंत्रिपद नाही तर मी….. राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याबद्दल अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कर्जत येथिल राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा गोप्यस्फोट केला आहे. २ जुलै रोजी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी होत असताना झालेल्या सर्व बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नते अनिल देशमुख हे देखील उपस्थित होते.

तसेच मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी माघार घेतल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला आहे.

अनिल देशमुख हे माझ्याबरोबर होते. सगळ्या बैठकांना ते हजर होते. त्यांनी सांगितलं होतं की मला मंत्रिमंडळात स्थान मिळालं पाहिजे. भाजपने सांगितलं की, आम्ही सभागृहात खूप आरोप केले आहेत. लगेच मंत्रिमंडळात त्यांना घेतलं तर आमच्या विश्वासहार्यतेवर प्रश्न निर्माण होईल त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेता येणार नाही.

यामुळे अनिल देशमुखयांचं नाव कमी झालं. त्यामुळे अनिल देशमुख म्हणाले की, जर मी मंत्री नसेल तर मी तुमच्यासोबत नाही. हे स्पष्ट आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असेही अजित पवार म्हणाले.

Leave a Comment