मालेगावचे (Malegaon) माजी आमदार रशीद शेख (Rashid Shaikh) यांचे सोमवारी (4 डिसेंबर ) रात्री निधन झाले. रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ते 65 वर्षाचे होते. अलीकडेच त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना मालेगावच्या रुग्णालयात दाखल होते. परंतु त्रास वाढल्यानंतर नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हसतमुख, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मालेगाव मतदार संघाचे दोन वेळा ते आमदार राहिले होते. 1999 मध्ये रशीद यांनी मालेगावमधून 25 वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या निहाल अहमद यांचा पराभव करून धक्का दिला होता.
मालेगाव महानगर पालिकेचे महापौर पदाची धुरा त्यांनी सांभाळली, अलीकडेच राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला होता.ते आधी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष होते. काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री, पक्षसंघटना व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणींकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत होत्या. याच पार्श्वभूमीवर रशीद शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.
