CID fame Dinesh Phadnis Death : ‘सीआयडी’ या लोकप्रिय क्राईम थ्रिलर शोमध्ये ‘फ्रेड्रिक्स’ची भूमिका साकारणारे अभिनेता दिनेश फडणीस यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले आहे.
दिनेश यांच्यावर मुंबईतील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे म्हटले जात आहे. काल रात्री म्हणजेच 4 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर आज 5 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिनेश यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. इतकंच नाही तर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता असे देखील म्हटले जात होते.
मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कारण हृदयविकाराचा झटका नसून दुसरा आजार होता. त्याची माहिती CID या मालिकेत दयाची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टीनं दिली होती.
