Virat Kohli : विराट कोहलीचे शतक! अहमदाबाद कसोटीत ‘रन मशिन’ सुसाट

Virat Kohli : टीम इंडियाचा रन मशिन विराट कोहलीने अहमदाबाद कसोटीत शानदार शतक झळकावून इतिहास रचला. त्याने 241 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील 28 वे शतक आहे. या डावात कोहलीने आपल्या फलंदाजीच्या शैलीत बदल केला आणि अतिशय संथ गतीने शतकी मजल मारण्यात यशस्वी झाला.

आपल्या शतकी खेळीत त्याने 80 धावा पळून काढल्या तर केवळ 5 चौकारांच्या सहाय्याने त्याने 20 धावा जमवल्या. संपूर्ण खेळीदरम्यान त्याने आपले लक्ष विकेटवर टिकून राहण्यावर दिले आणि संघाची धावसंख्या 400 पार पोहचवली.

विराट कोहलीने अहमदाबाद कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापासून एक टोक खंबीरपणे सांभाळले. त्याने जवळपास 40 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. तीन अर्धशतकी भागिदारी रचल्या. सोमवारी, विराटने शुभमन गिल (128) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 58, तर रविवारी रवींद्र जडेजा (28) सोबत चौथ्या विकेटसाठी 64 आणि केएस भरतच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 84 धावांची भागिदारी रचली. (Virat Kohli 100)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे 75 वे शतक
विराटने 23 नोव्हेंबर 2019 रोजी कोलकाता येथे बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. आता 3 वर्षे 3 महिने 17 दिवसांच्या (1204 दिवस) प्रतीक्षेनंतर विराटच्या बॅटने तीन आकडी धावसंख्येचा टप्पा पूर्ण केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सातवे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे 75 वे शतक आहे

Leave a Comment