ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधला आहे. नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रिपद अवघ्या दोन महिन्यात जाणार आहे, असा गौप्यस्फोटच वैभव नाईक(Vaibhav Naik) यांनी केला आहे.
त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाईक यांच्या या विधानामुळे कोकणात पुन्हा एकदा नारायण राणे यांचं मंत्रिपद जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
येत्या दोन महिन्यात राणेंच मंत्रिपद जाणार आहे, असा गौप्यस्फोट आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. आतापर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या राणेंच राजकीय अस्तित्व आता भाजप ठरविणार आहे.
भाजपला राणेंची राजकीय दृष्टया गरज नाही. त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार आहे, असं वैभव नाईक म्हणाले. त्यामुळे नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. नाईक यांनी राणेंचं मंत्रिपद का जाणार याचं कारणही सांगितलं.
