गारपीट ग्रस्तांचा पारनेरमधील जवळे, पानोलीत रस्ता रोको…

पारनेर(DSNews24/संतोष कोरडे) तालुक्यातील सांगवी सुर्या येथे गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचे साखळी उपोषण चालु असताना शासणाकडून दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी जवळे व पानोलीत एकाच वेळी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात शेतकरी आपल्या जनावरांसह सामील झाले होते.

पंधरा दिवसांपुर्वी सांगवी सुर्या पंचक्रोशीत प्रचंड गारपीटीने थैमान घातले होते. फळपिके , चारपिके, भाजीपाला पिके पुर्ण नष्ट झाली होती. गारांमुळे काही शेतकरी व जनावरे जखमी झाली. या आपत्तीनंतर राज्यकर्ते व अधिकारी यांचे पाहणी दौरे झाले. परंतु आपत्ती मोठी असनाही प्रत्यक्ष मदत कुणालाहि मिळाली नाही. जनावरांना चारा नाही, त्यामुळे चारा डेपो चालु करण्याची मागणी होती. आतापर्यंत केवळ नुकसानीचे पंचनामे व कागदी सोपस्कार पुर्ण झाले आहेत. चारा पुरठ्याची तरतुद शासणाकडे नाही असे अजब उत्तर निवासी तहसीलदार यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेवून दिले.

केंद्र शासणाने अचानक घेतलेल्या कांदा निर्यात बंदी , इथेनॉल निर्मीतीस बंदी, दुधाचे घसरलेले भाव यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. केंद्र सरकारला जुलमी सरकार म्हणुन यावेळी शेतकऱ्यांनी मोठी घोषणाबाजी केली. सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले . या आंदोलनात शेतकऱ्यांच्या भावना आतिषय तीव्र होत्या . पानोलीत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करत दुध रस्त्यावर ओतले. शासनाचा निषेध केला. आंदोलनाला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते .

 

निवडणुकांवर बहीष्काराचा ठराव …. !

शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास व गारपीट पिडीतांना भरपाई न दिल्यास पीडीत गावे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार आहेत . विषेश ग्रामसभा बोलावून तसे ठराव केंद्र सरकार व निवडणुक आयोगाला पाठविण्यात येणार आहेत . तसा ठराव देखील आंदोलणावेळी सर्वाणुमते घेण्यात आला .

 

राजकारण शेतकऱ्यांच्या मुळावर ….. ! 

पारनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार व खासदार यांच्यातील राजकारणाचा फटका मात्र गारपीट ग्रस्तांना बसत आहे. एकीकडे शेतकरी होरपळत असताना राज्यकर्ते व त्यांचे कार्यकर्ते यांची मेडीयाबाजी जोमात चालु आहेत. मदतीच्या श्रेयवादामुळेच गारपीट ग्रस्त वंचीत राहील्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी दोघा लोकप्रतिनिधींवर केला.

 

विधानसभेत लक्षवेधी….. !

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांची मागणी विधानसभेत लक्षवेधीच्या रूपाने मांडली. त्यावर शासण काही हालचाल करणार का ? याची वाट शेतकरी पाहत आहेत.

Leave a Comment