पारनेर(DSNews24/संतोष कोरडे) पारनेर येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेची कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृहावर नुकतीच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पारनेर तालुक्यातील अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तसेच शेतीच्या संबंधित असलेल्या प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात झाली.
दुष्काळी पारनेर तालुक्याच्या पाणी प्रश्नावर यावेळी प्रामुख्याने चर्चा झाली पाणी प्रश्नावर आता आक्रमकपणे भूमिका मांडली पाहिजे प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशी यावेळी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांमधून मागणी करण्यात आली. यावेळी संतोष वाडेकर यांनी आक्रमक भूमिका घेत आणि संघटनेला पुन्हा एकदा उर्जित अवस्था आणण्यासाठी खऱ्या अर्थाने पारनेर तालुक्याच्या पाणी प्रश्नावर आता रणसिंग फुंकले आहे.
पारनेर येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीमध्ये संतोष वाडेकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना असे म्हटले आहे की आता पाणी प्रश्नावर आपण एकत्र आले पाहिजे. तालुक्याला पाणी प्रश्नाचे महत्त्व समजलं पाहिजे. पारनेर तालुका अनेक दिवसापासून दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो हा तालुका दुष्काळातून मुक्त करण्यासाठी आपल्या हक्काचे पाणी आता पारनेरला मिळालं पाहिजे.
यावेळी पाणी प्रश्नावर आता उपोषणाचे हत्यार उपासण्यात येणार असल्याचे वाडेकर यांनी यावेळी बैठकीमध्ये जाहीर केले. भूमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेत आता पारनेर तालुक्यातील पाणी प्रश्नावर आंदोलन उभे करणार आहे. पिढ्यान पिढ्यांचा असलेला तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना आता एकत्रित लढा उभारणार असून येत्या 15 जानेवारी 2024 रोजी आमरण उपोषणाला पारनेर तहसीलवर बसणार आहे. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणे बरोबर लवकरच पत्र व्यवहार करण्यात येणार आहे असे यावेळी वाडेकर यांनी स्पष्ट केले.
पारनेर तालुक्यातील पठार भागावर प्रत्येक गावात जाऊन पाणी प्रश्न संदर्भात जनजागृती करून लवकरात लवकर पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वसामान्यांना सोबत घेऊन तालुक्यात लढा उभा करणार आहे.
१ टीएमसी पाण्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने व पाणी प्रश्न हा खऱ्या अर्थाने तालुक्याचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने भूमिपुत्र शेतकरी संघटना आता आक्रमक भूमिका घेत आहे असे यावेळी वाडेकर यांनी स्पष्ट केले. पारनेर येथे शासकीय विश्रामगृहावर झालेल्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पारनेर तालुक्यातील पाणी प्रश्नावर लढा उभारण्यासंदर्भातला सर्वानुमते निर्णय व ठराव यावेळी घेण्यात आला आहे.
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या पदाधिकारी बैठकीमध्ये यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे सचिव किरण वाबळे, राज्य संपर्कप्रमुख अशोक आंधळे, जिल्हा संघटक संतोष वाबळे, पारनेर तालुका अध्यक्ष विशाल करंजुले, ज्येष्ठ नेते वसंत साठे, सामाजिक कार्यकर्ते बाळश्रीराम पायमोडे, भूमिपुत्रचे तालुका कार्याध्यक्ष संजय भोर, देसवडे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संजय भोर, पारनेर तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब वाळुंज, सुभाष पाटील करंजुले, भूमिपुत्रचे पारनेर तालुका प्रवक्ते राजू रोकडे, युवक नेते प्रवीण खोडदे, दत्तात्रय झावरे, आदी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी झालेल्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
