मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा 

मराठा आरक्षणाच्याबाबत एक सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली.

तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी यावेळी आणखी एक मोठी घोषणा केली.

मराठा आरक्षणासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलवणार आहे. राज्य मागासवर्ग आयोग आपला अहवाल महिन्याभरात देणार आहे. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेतलं जाईल, अशी मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

“मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण मिळवून द्यायचं आहे. राज्य सरकार सर्व शक्ती पणाला लावत आहे. राज्य मागासवर्ग महिन्याभरात आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल.

त्यानंतर आवश्यकतेनुसार राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधी मंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी देतो”, असं एकनाथ शिंदे सभागृहात म्हणाले.

Leave a Comment