साकूर येथे स्व.अशोकराव खेमनर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

संगमनेर तालुक्यातील साकूर येथील स्व. अशोकराव बाजीराव पा. खेमनर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर, वृक्षवाटप, मंदिर साफसफाई, विद्यार्थ्यांना खाऊ वाटपासह विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन वार – बुधवार दि. १५ मार्च रोजी करण्यात आले असल्याची माहिती विद्या प्रबोधिनी प्रशालेच्या प्राचार्या गुलशन जमादार व मुख्याध्यापक सुभाष घुगरकर यांनी दिली.

साकूर पठारभागातील कणखर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व. अशोकराव खेमनर यांचा वारसा साकूर सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर हे चालवत आहे. ज्या शिक्षण संस्थेच रोपट स्व. अशोकराव खेमनर यांनी लावून वट वृक्षात रूपांतर केलं. दरवर्षी त्या विद्या प्रबोधिनी प्रशालेत स्व. अशोकराव खेमनर यांची जयंती विविध उपक्रम राबवून साजरी केली जाते. यंदाही विद्या प्रबोधिनी प्रशालेच्या वतीने विविध उपक्रमांसह कार्यक्रमांचे आयोजन करून जय्यत तयारी सुरू केली आहे.

१५ मार्च रोजी विद्या प्रबोधिनी प्रशालेत सकाळी स्व. अशोकराव खेमनर यांना अभिवादनाचा कार्यक्रम ठेवला आहे. तसेच साकूर परिसरातील जिल्हा परिषद शाळा साकूर, उर्दू शाळा साकूर, शासकीय आश्रमशाळा साकूर, जिल्हा परिषद शाळा देवी पठार, जिल्हा परिषद शाळा जोगेपठार, जिल्हा परिषद शाळा हळदा वस्ती, जिल्हा परिषद शाळा चितळकर वस्ती, जिल्हा परिषद शाळा चिंचेवाडी, जिल्हा परिषद शाळा हिरेवाडी, जिल्हा परिषद शाळा जांभुळवाडी, जिल्हा परिषद शाळा आनंदवाडी, जिल्हा परिषद शाळा तास्करवाडी, तसेच विद्या प्रबोधिनी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे.

तसेच गावातील महादेव मंदिर, शनि मंदिर, राम मंदिर, दत्त मंदिर, सावता महाराज मंदिर, संत गोरोबा मंदिर, संत नामदेव महाराज मंदिर, गणपती मंदिर, बिरोबा मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, मारूती मंदिरांसह तसेच चर्च, बौद्ध विहार, मस्जिद ( उर्दू शाळा) या धार्मिक स्थळांची साफसफाई करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जाणार आहे.

तसेच साकूर येथीलच मातोश्री हॉस्पिटलमध्ये डॉ. पवन खेमनर यांनी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. तसेच रक्तदान करणाऱ्यांना केशर आंब्याचे झाड वाटप करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन डॉ. पवन खेमनर यांनी केले आहे.

Leave a Comment