मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी (दि.1 जानेवारी) बदली आणि पदस्थापनेचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आले आहेत.
राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी याबाबचे आदेश काढले आहेत.
बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे
1. श्रवण दत्त (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, नंदूरबार
2. पी. आर. पाटील (पोलीस अधीक्षक नंदूरबार ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे
3. अविनाश एम बरगळ (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती
4. बच्चन सिंग (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, अकोला)
5. चेतना शेखर तिडके (पोलीस उपायुक्त, नागपूर शहर ते अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई
पोलीस अधीक्षक अकोला संदीप घुगे यांची बदली करण्यात असून त्याच्या बदलीने पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील. तसेच अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई पंकज कुमावत यांच्या पदोन्नतीने सुधारित पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.
