भाजपने सोपवली गणेश पुरी यांच्यावर मोठी जबाबदारी

नागपूर(DSNews24/किरण पुरी) भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर भटके विमुक्त आघाडी अध्यक्षपदी गणेश शंकर पुरी यांची निवड करण्यात आली आहे. भाजप शहर अध्यक्ष जितेंद्र बंटी भाऊ कुकडे यांनी ही केलीय. निवडीचे नियुक्ती पत्र बंटी कुकडे यांचे हस्ते तसेच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष भटके विमुक्त आघाडी विलासराव पु काहाळे प्रभारी नागपूर यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.

त्या बैठकीला भाजपा ग्रामीण अध्यक्ष तथा माजी आमदार श्री सुधाकरजी वि कोहळे प्रदेश भटके वीमुक्त आघाडी माजी अध्यक्ष योगेश बन, विदर्भ विभाग प्रमुख सीमा कश्यप नागपूर महामंत्री विष्णू चांगदे, रामभाऊ आंबुलकर,भोजराज डुंबे, प्रदेश महिला आघाडी प्रमुख वंदना यंगटवार विदर्भ विभाग प्रमुख सीमा कश्यप उपस्तित होते.

याबद्दल गणेश पुरी यांनी माननीय नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखरजी बावनकुळे, ग्रामीण अध्यक्ष तथा माजी आमदार श्री सुधाकरजी वि कोहळे प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे, प्रदेश उपाध्यक्ष विलासराव पु काहाळे यांचे आभार मानले.

गणेश पुरींचे डॉ.रोहित माडेवार, किशोर सायगण,  मंगेश पुरी, अश्विनी नागुलवार यांनी अभिनंदन केले.

Leave a Comment