गेल्या महिनाभरापूर्वीच अवकाळीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकांना शुक्रवारी पुन्हा पावसाने झोडपले. नगर शहर, तालुका व जिल्ह्याच्या अनेक भागांत शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली.
महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अनेक ठिकाणी सूर्यदर्शनही झाले नाही. शिवाय थंड वारेही वाहत होते.
त्यामुळे हमखास पाऊस पडेल, अशी स्थिती होती. दरम्यान, शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास नगर शहरासह नगर तालुका परिसरात तासभर जोरदार पावसाने हजेरी लावली. शिवाय कुकाणा व जिल्ह्याच्या काही भागात हलक्या सरी बरसल्या.
