अहमदनगर, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांवर मोठं संकट 

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं थंडी तर कुठं ढगाळ वातावरण जाणावत आहेत. तर काही भागात पावसाची (Rain) शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दिनांक 10 जानेवारी पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळलेले वातावरण राहणार आहे. तर तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ गडगडाटीसह अवकाळी पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

विशेषतः खान्देश आणि लगतच्या नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी 9 जानेवारीला पावसाची शक्यता अधिक असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.

तसेच पश्चिम मध्य प्रदेश उपविभागाबरोबरच महाराष्ट्रातील लगतच्या खान्देशातील शिरपूर शहादा चोपडा यावल रावेर तालुक्याच्या तुरळक भागात तुरळक ठिकाणी किरकोळ गारपीटीची शक्यताही नाकारता येत नसल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.

Leave a Comment