मेष : आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो.
वृषभ : आरोग्य चांगले राहील. आर्थिक जीवनात आज आनंद राहील.यासोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकता.
मिथुन : तुमची समस्या गंभीर आहे . पण तुमच्या अवतीभवतीच्या लोकांना तुमच्या वेदना समजणार नाहीत. कारण यात लक्ष घालणे हे त्यांचे काम नाही असे त्यांना वाटत राहील.
कर्क : आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने, आपल्या आवडी-निवडी जपल्याने तुमच्यात सकारात्मक बदल होतील.
सिंह : आज तुम्हाला जाणीव होईल की, लग्नाच्या वेळी जी वचने दिली होती, ती सगळी खरी होती. तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.
कन्या : सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल.
तूळ : आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल.
वृश्चिक : अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा, अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल.
धनु : वैरभाव महागात पडू शकतो. आपल्या सहिष्णुतेला, उदार स्वभावाला यामुळे सुरूंग लागू शकतोच; पण आपल्या विचार करण्याच्या शक्तीलाही धक्का लागू शकतो.
मकर : फूट पाडणारे विचार भावना आणि आवेग नियंत्रणात ठेवा. आपले प्रतिगामी विचार, जुनाट संकल्पना तुमच्या प्रगतीला मारक ठरतील.
कुंभ : तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. तुमचे प्रेम असफल ठरेल. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील.
मीन : एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद होईल.
