रमेश फिरोदिया महाविद्यालयात दोन दिवसीय आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) साकुर येथील रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने आर्थिक साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.सचिन गुंजाळ होते. त्यांनी आर्थिक गुंतवणुकीचे प्रकार, अल्पबचत योजना याविषयी मार्गदर्शन करून वित्तीय साक्षरता कशी साध्य करावी, हे विद्यार्थ्यांना विविध उदाहरणाद्वारे सांगितले. त्याचबरोबर ग्राहकांची फसवणूक कशी होते व ती दूर करण्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, या संबंधी मुलभूत मार्गदर्शन केले.

तर कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सचिन घोलप म्हणाले, आर्थिक नियोजन हे प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. अन्यथा अर्थव्यवस्था मोडकळीस येते. त्यासाठी वित्तीय साक्षरता सर्वांकडे असणे आवश्यक आहे त्याचबरोबर ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहून योग्य तेथे गुंतवणूक केली पाहिजे. व पैशाचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे.

या कार्यशाळेसाठी उपप्राचार्य आर. आर. गिरी, प्रा. कल्पना शेळके, प्रा.गणेश कुलकर्णी , प्रा. दत्तात्रय आसवले, प्रा.एम.टी.खेमनर, प्रा. पोपट खेमनर, प्रा.शंकर राशिनकर, प्रा.प्राजक्ता बिडवे, प्रा.गणेश साळुंके, प्रा.योगेश साळुंके, प्रा.राजेंद्र लेंडे, प्रा.जया रक्टे, प्रा.पुजा वलवे, प्रा.लक्ष्मण कातोरे, प्रा.शबाना शेख, प्रा.प्रियंका हाके, प्रा. स्वाती सागर, प्रा.स्वाती ढोकरे, प्रा.संदिप खेमनर, प्रा.हर्षदा हारदे, प्रा.शिरसाट, श्री.मनोहर दुरगुडे, श्री. महेश पोखरकर, श्री.पुंजाहरी वारे, श्री.लक्ष्मण जाधव, श्री.भाऊसाहेब बहिरट व सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. गणेश कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्राजक्ता बिडवे यांनी केले. तर आभार प्रा.शबाना शेख यांनी मानले.

Leave a Comment