बिरेवाडी येथील अंजनी गडावर पेव्हिंग ब्लॉग कामाचा शुभारंभ 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील ढुमके वस्तीवरील (अंजनी गड)  हनुमान मंदिरासमोर सभामंडपात माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक विकास निधीतून पेव्हिंग ब्लॉग मंजूर झाले आहे. या कामाचा नुकताच शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मिरा शेटे, सरपंच जिजाबाई सागर, उपसरपंच पोपट नान्नर, माजी उपसरपंच अण्णा कढणे, पांडुरंग सागर, सुदाम सागर, आण्णासाहेब ढेंबरे, सदस्य पंढरीनाथ ढेंबरे, पांडुरंग ढेंबरे, माऊली ढेंबरे, संजय सागर आदि उपस्थित होते.

Leave a Comment