सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका बसणारी बातमी समोर आली आहे. सुधा शक्ती दुधाच्या दरात 1 रुपयाने वाढ झाली असून आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून दुधाचे नवे दर लागू होणार आहेत.
सुधा शक्ती दुधाच्या दरात 1 रुपयाने वाढ झाली आहे. आता सुधा शक्ती दुधाचा दर 54 रुपयांऐवजी 55 रुपये प्रतिलिटरने विकले जाणार आहे. तर दुसरीकडे लस्सीचे वजन आणि किंमत या दोघांमध्ये घट करण्यात आली आहे.
आता साधा लस्सी पॅक 150 ml ऐवजी 140 ml मध्ये मिळणार आहे. त्यामुळे लस्सी पिणे सर्वसामान्यांना परवडणार असून त्याची किंमत दोन रुपयांनी कमी झाली आहे. सुधा प्लेन लस्सी 12 रुपयांऐवजी 10 रुपयांना मिळणार आहे.
तर 80 ग्रॅम वजनाचे मिस्टी दही आता 12 रुपयांऐवजी 10 रुपयांना मिळणार आहे. या किंमतीतील 1 फेब्रुवारी 2024 पासून बदल करण्यात येत आहे.
