निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर होताच शरद पवार गटाची मोठी घोषणा 

शरद पवार गटाकडून नवी घोषणा जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून निकालानंतर नवी मोहीम जाहीर करण्यात आली आहे. आमचा पक्ष आणि चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार असं मोहीमेचं नाव आहे. शरद पवार गटाकडून या नव्या मोहीमेची माहिती ट्विटरवर देण्यात आली आहे.

नुकतंच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमचा पक्ष आणि चिन्ह म्हणजे शरद पवार, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

शरद पवार यांनी शुन्यातून पक्ष उभा केला. शुन्यातून स्वत:चं आयुष्य उभं केलं. त्यांचं कुणीही काका, मामा, वडील राजकारणात नव्हते. त्यांनी स्वत: सुरु केलेला हा पक्ष आहे. ते पक्षाचे फाऊंडर मेंबर असूनही शुन्यातून सुरु केलेला पक्ष आज त्यांच्याकडून काढून घेण्यात आला.

पण मला त्याचं काही आश्चर्य वाटत नाही. सुप्रीम कोर्टाची आधीची ऑर्डर वाचली असेल तर आमदारांच्या आकडेवारीवरुन पक्ष ठरत नाही तर संघटना ठरवते. संघटना ही शरद पवार यांच्यासोबत आहे. त्यामुळे या ऑर्डर विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave a Comment