निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार म्हणाले 

महाराष्ट्रात मागे अनेक राजकीय घटना घडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात निर्णय निवडणुक आयोगाने दिला. त्यात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळाले. ज्यामुळे मी निवडणुक आयोगाचा निर्णय विन्रमपणे मान्य करतो.

तसेच लोकशाहीत बहुमताला प्राधान्य दिलं, त्याबद्दल आयोगाचे आभार मानतो, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह यासाठी निवडणूक आयोगाकडून निकाल दिला जाणार होता. दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे अजित पवार गटाने ट्विट करत ‘आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!’ असे म्हणटले आहे.

Leave a Comment