अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर निलेश लंके यांच्या पत्नी राणी ताई लंके यांच्या नावाचीही सध्या नगर लोकसभा मतदारसंघातून जोरदार चर्चा सुरू आहे.
तशी त्यांनी तयारीही सुरू केली आहे. यातच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने लंके यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी लंके यांनी महाविकास आघाडीकडून निवडणुक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
संभाजी कदम यावेळी म्हणाले की, येणाऱ्या लोकसभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडे निलेश लंके साहेबांनी यावं. आज जरी दुसऱ्या गटात असले तरी त्यांनी महाविकास आघाडीकडे यावं. प्रसंगी तुतारी किंवा मशाल हाती घेऊन निवडणुक लढवावी. प्रसंगी दक्षिणेचा जो भाग आहे. दक्षिणेतला उमेदवार असावा अशी आमची भूमिका आहे.
