जुन्नर हळहळले! दोन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथील दोन अल्पवयीन मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना २८ एप्रिल रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.

काय घडलं नेमकं?

सोहम जयसिंग नवले (वय 12) आणि अभि महेश पवार (वय 10) असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. दुपारी सोहम आणि अभि खेळतांना शेततळ्यात बुडाले. काही वेळानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी दोघांचाही शोध सुरु केला. दोघेही कुठेही सापडत नसल्याने ग्रामस्थांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली तेव्हा पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी धावून आले. रेस्क्यूने दोन्ही मुलांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले आहे.

ही घटना ज्या शेततळ्यात घडली ते गाडेकर नावाच्या शेतकऱ्याच्या मालकी हक्काचे होते. सोहम आणि अभि हे दोघेही गरीब कुटुंबातील, अभ्यासू आणि खेळकर स्वभावाची मुले होती. त्यांच्या अकाली निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment