भंडाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीच्या मृत्यूनंतर ८ वर्षीय मुलीसह राहणाऱ्या महिलेचं दिरासोबत प्रेमसंबंध जुळलं. मात्र, वहिनीनं लग्नास नकार दिल्यानं दिरानं वहिनीची धारदार शस्त्रानं गळा चिरून निर्घृण हत्या केली.
ही घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील भागडी गावात घडली. माधुरी अंबादे (३२) असं मृत महिलेचं नावं आहे. तर, गौरव अंबादे (२५) असं आरोपीचं नावं आहे. आरोपी आणि मृत महिला हे दोघेही चंद्रपूरच्या ब्रम्हपुरीचे आहेत.
भंडारा जिल्ह्यातील पालांदूर इथं एका विवाहासाठी हे आले असताना भागडी गावातील नातेवाईकांकडे रात्री मुक्कामी होते. रात्री दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून वाद झाला, यावेळी वहिनीनं लग्नास नकार दिल्यानं दीर गौरवनं तिची हत्या केली. बाजूला झोपलेल्या मुलीला जाग आली आणि तिनं आरडाओरड केल्यानं आरोपीनं घटनास्थळावरून दुचाकीनं पळ काढला. या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येतं आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे रविवारी (दि. २६) पहाटे घडली. ब्रह्मपुरी येथील माधुरी अंबादे (३२) या महिलेची तिच्याच दिराने धारदार शस्त्राने गळा कापून निर्घृणपणे हत्या केली. ही थरकाप उडवणारी घटना महिलेच्या लहान मुलीसमोर घडल्याची माहिती आहे. माधुरी अंबादे असे मृत महिलेचे नाव आहे. दुचाकीवरून फरार झालेल्या आरोपी गौरव अंबादे याचा पोलिस शोध घेत आहेत. माधुरी तुळसीदास अंबादे या आपली मुलगी ( वय ८, रा. ब्रह्मपुरी) आणि आरोपी गौरव अंबादे (२५, रा. ब्रह्मपुरी) याच्यासह पालांदूर येथे एका लग्न समारंभासाठी गेलेल्या होत्या. रविवारी (दि. २६) परत येताना उशीर झाल्यामुळे त्यांनी भागडी येथील नातेवाईकांच्या घरी मुक्काम केला. त्याच रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे
प्रेमसंबंधातून हत्येचा संशय
एका मराठी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पाच वर्षांपूर्वी माधुरी अंबादेच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर ती आपल्या मुलीसह तिथेच राहत होती त्यावेळी तिचे आरोपी दिरासोबत प्रेमसंबंध जुळले. आरोपीने लग्नासाठी तगादा लावला होता; मात्र माधुरीने त्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. या वैयक्तिक वादातूनच हत्येची घटना घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस या घटनेचा आणि आरोपीचा शोध घेत आहेत.
