आज राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊस

आजही राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजही पाऊस हजेरी लावणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नागपूर, अकोला, अमरावती, गोंदिया या 4 जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडणार आहे.

चारही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटास पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुढील 24 तासांत मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातही तुरळक ठिकाणी अति हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर, विदर्भातही अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 4 मार्चनंतर राज्यातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment