आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

 

वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा लाभेल.

 

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

कर्क : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आरोग्य उत्तम राहील.

 

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

तूळ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

 

धनू : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

 

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

 

मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Leave a Comment