कंटेनर आणि पिकअपचा भीषण अपघात, ५ जण ठार 

बीड सोलापूर रस्त्यावरील नेकनुरजवळ असलेल्या सासेवाडी नाजिक रात्री कंटेनर अन् पिकअपचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून मदत कार्य वेगाने सुरू आहे

बीड तालुक्यातील ससेवाडी गावाजवळ कंटेनर अन् पिकअपची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे.

घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. गाड्यांमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. नेकणुर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नसून अपघाताने वाहतूककोंडी निर्माण झाली आहे.

Leave a Comment