मोठी बातमी! महाराष्ट्रात राजकीय भूकंप….

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. नुकताच शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला. परिणामी शिंदे गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे.

याचिच प्रचिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यात आज पाहायला मिळाला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भूकंप येणार असून आमचे विरोधक ते सहन करणार नाही, असं भाकित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अटल सागरी सेतूचं लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

देशातील लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भूकंप येणार आहे. आमचे विरोधक ते सहन करणार नाही. हे सत्य आहे. शिवडी नाव्हा शेवा हा पूल नसून विकासाचा मार्ग आहे. विकासच्या कामाबद्दल विरोधकांच्या पोटात नेहमी दुखतं, त्यांना हे सहन होत नाही. अहंकारी लोकांचा अहंकार संपणार आहे. आमची जबाबदारी वाढली आहे. आता महाराष्ट्रात 45 पार असा संकल्प घेऊन आम्ही पुढे जात आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

शिंदे पुढे म्हणाले, अटल सेतू प्रकल्प हा गेम चेंजर प्रकल्प आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये जे आधीच्या सरकारने केलं नाही, ते 9 वर्षांमध्ये मोदींनी करून दाखवलं आहे. जगभरात पंतप्रधान मोदींचं कौतुक होत आहे. जगभरात भारताचं नाव मोठं झालं आहे. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रासाठी त्यांचं असंच प्रेम राहो.

Leave a Comment