महाराष्ट्रातील काँग्रेसचा बडा नेता नाराज? शिंदे गटात….

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार चाचपणीला सुरुवात केली असून, जागावाटपावर भर दिला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद असून, हा वाद चव्हाट्यावर येत असल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे महायुतीने तयारीला सुरुवात केली आहे. यातच आता काँग्रेसचा मुंबईतील एक बडा नेता नाराज असून, लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतो, असा कयास बांधला जात आहे. यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेस नेते मिलिंद देवरा पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचीही शक्यता आहे. काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरा हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा केला जात आहे.

मिलिंद देवरा यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल, असे म्हटले जात असून, शिंदे गटातील प्रवेशामुळे पर्यायाने महायुतीची ताकद वाढेल, अशी चर्चा आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मिलिंद देवरा यांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जाते.

Leave a Comment