पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 1 जुलैपासून पाऊस धुमाकूळ घालणार असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात राज्यात पाऊस होणार आहे. मुंबई, पुणे, अकोले, अहिल्यानगर, संगमनेर, ओझर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागातील शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात काळजी घ्यावी. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस असेल.
अतिवृष्टी होऊ शकते. पुण्यातही अतिवृष्टी होऊ शकते. शिर्डी, राहाता, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, फुलंब्री या पट्ट्यातही जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. जमिनीत ओल असेल तर पेरणी करून घ्यावी अन्यथा 10 जुलैपर्यंत थांबावे लागेल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
