मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज संध्याकाळी रत्नागिरीतील खेडमध्ये गोळीबार मैदानात मोठी सभा होणार आहे. शिंदे गटाने या सभेची जय्यत तयारी केली आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी ही सभा आयोजित केली आहे.
काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याच मैदानावर जाहीर सभा झाली होती. आता याच मैदानावरून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातील शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी मोठा दावा केला.
राष्ट्रवादी(NCP) आणि ठाकरे गटाचे १३-१४ आमदार शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
‘कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातले १३ ते १४ आमदार आमच्यात येणार हे नक्की’, असं उदय सामंत म्हणाले. ‘कोण आमच्यात येणार आहेत ते त्यांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती आहे’, असंही उदय सामंत म्हणाले.
