Pune : आगामी लोकसभा निवडणूक आपण शिर्डी मतदार संघातून लढणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athavale) यांनी सांगितले.
याबाबत भाजप पदाधिकार्यांशी आपली प्राथमिक चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले. शिर्डी बरोबरच आणखी दोन लोकसभेच्या जागा आरपीआय लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यातील गोल्फ क्लब येथे शासकीय विश्रामगृहावर आठवले पत्रकार परिषदेत बोलत होते. आरपीआयमुळे भाजपला एकूणच संपूर्ण देशभरात फायदा झाल्याचे दिसते.
यामुळे केंद्रात मंत्रिपदाप्रमाणे, राज्यातही विधानसभेवेळी 15 जागा व दोन मंत्रिपदे अन् एका महामंडळाची मागणी आपल्या पक्षाची असल्याचे, आठवले म्हणाले.
