शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट, शिवाजीराव आढळराव……

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. त्यातच आता महाराष्ट्रातही सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, राज्यात शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

शिंदे गटाचे नेते आढळाराव पाटील आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झालंय. शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर लोकसभा लढवणार असल्याचे सांगण्यात येतंय.

शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या अमोल कोल्हे खासदार आहेत. मात्र राष्ट्रवादी फुटल्यानंतर अमोल कोल्हे हे शरद पवार गटात गेले. त्यानंतर आता शिरुरमध्ये महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार असा चंग अजित पवारांनी बांधलाय.

त्यामुळं या मतदार संघावरुन महायुतीत स्पर्धा निर्माण झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र आता आढळरावांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment