धक्कादायक! लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघातात मृत्यू 

सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्तीसगढ येथील लोकप्रिय अभिनेता सूरज मेहर (Suraj Meher) याचं निधन झालं आहे. नारद मेहर नावाने सूरज लोकप्रिय होता.

‘आखिरी फैसला’ या चित्रपटाचं तो शूटिंग करत होता. बुधवारी शूटिंग संपवून घरी परतत असताना रस्ते अपघातात त्याचं निधन झालं. महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी अभिनेत्याचा साखरपुडा होता त्याच दिवशी त्याचे निधन झाले आहे. सूरज मेहर अनेक चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून झळकला आहे. छत्तीगढमध्ये अनेक चित्रपटांमध्ये सूरज दिसून येतो. शूटिंगमधून परतत असताना अभिनेत्याच्या स्कॉर्पियोने एका ट्रकला जोरदार धडक दिली. छत्तीगढमधील पिपरडुला गावातील ही घटना आहे. 9-10 एप्रिलच्या मध्यरात्री सूरजचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

सूरज मेहर ग्राम सरिया बिलाईगढ भागात राहणारा आहे. या भीषण अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. सरसीवा पोलीस ठाण्यातील पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्कॉर्पियोमध्ये फसलेल्या बाकी लोकांना बाहेर काढले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले.

Leave a Comment