बिग ब्रेकिंग! महाराष्ट्रात कॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप 

कॉंग्रेसला पुन्हा एकदा मोठा भूकंपाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे बडे नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. तसा दावाच राज्याचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी केला आहे.

अत्राम यांनी थेट बॉम्बच फोडल्याने एकच खळबळ उडाली आहे. वडेट्टीवार यांनी पक्षप्रवेशासाठी अनेक बैठका केल्याचा दावाही अत्राम यांच्याकडून करण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला आहे. विजय वडेट्टीवार लवकरच भाजपमध्ये येणार आहेत. त्यांनी भाजप नेत्यांसोबत अनेक बैठका केल्या आहेत. या बैठकांचा मी साक्षीदार आहे. या चर्चा झाली मला माहीत आहे, असं धर्मराव बाबांनी म्हटल्याने खळबळ उडाली आहे.

Leave a Comment