‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

राज्यासह देशात आठवड्याभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील 24 तासात विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. गेल्या आठवड्याभरात पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे.

या वीकेंडलाही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्याच पावसाची शक्यता कायम आहे.

राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Comment