राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया येत्या १९ तारखेला असून यासाठी आता फक्त ५ दिवस शिल्लक आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या गटातील बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं समजलं आहे.
अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून संजीव राजे निंबाळकर आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आज संध्याकाळी संजीव राजे निंबाळकर यांचा शरद पवार गटात पक्ष पवेश होण्याची शक्यता आहे. संजीव निंबाळकर हे रामराजे निंबाळकरांचे पुतणे आहेत.
