संगमनेर(DSNews24/किरण पुरी) नाशिक – पुणे महामार्गालगत वरूडी पठार ते साकूर फाटा जाणाऱ्या सर्व्हिस रोड लगत असलेल्या दत्त मंदिरासमोर अंदाजे वय ३५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडालीय.
संगमनेर तालुक्यातील वरूडी पठार ते साकूर फाटा जाणारे सर्व्हिस रोड लगत दत्तमंदिर आहे. या मंदिरासमोरच सोमवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ३५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सदर व्यक्तीची ओळख पटली नसून पोलिस शोध घेत आहे.
सदर व्यक्तीचा रंग गोरा असून चेहरा गोल आहे. बांधा मध्यम व केस काळे पांढरे, दाढी मध्यम व अंगात निळ्या रंगाचा फुल बाह्याचा टिपके घातलेला शर्ट आहे. व राखाडी रंगाची पॅन्ट व पायात बुट घातलेला आहे.
