मोठी बातमी! लोकसभा निवडणूकीत ‘या’ दोन राज्यात भाजपला मोठा फटका बसणार….

देशभरात एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपकडून देखील ‘400 पार’ चा नारा देण्यात आला आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाने यावेळी हिंदी भाषिक राज्यांसह दक्षिण भारतावरही लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते दक्षिण भारतात प्रचार करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (15 एप्रिल) पुन्हा एकदा दक्षिण भारताच्या दौऱ्यावर जात आहेत. केरळ आणि तामिळनाडूमध्ये ते जाहीर सभा घेणार आहेत. दुसरीकडे, इंडिया आघाडी भाजपला रोखण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वीच भाजपला दोन राज्यात जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये कोणाला किती सीट मिळण्याची शक्यता?

एबीपी सी-व्होटरच्या सर्वेक्षणात, केरळमध्ये भाजप सुपडा साफ होण्याची शक्यता आहे. येथील सर्व 20 लोकसभेच्या जागा इंडिया आघाडी जिकंण्याची शक्यता असल्याचे सर्वेक्षणातून समोर येत आहे. तर एनडीएला राज्यात एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. त्याचवेळी, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या टाइम्स नाऊ ईटीजी सर्वेक्षणात 20 जागा असलेल्या केरळमध्ये काँग्रेसला 8 ते 10 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, भाजपला 0 ते 1 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर IUMLला 1 ते 2, सीपीएमला 6 ते 8 आणि इतरांना 1 ते 2 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

तामिळनाडूत कोणाला किती सीट मिळण्याची शक्यता?

एबीपी सी-व्होटर सर्वेक्षणानुसार, तामिळनाडूमध्येही एनडीएला राज्यात एकही जागा मिळण्याची शक्यता नाही, तर इंडिया आघाडी सर्व 39 जागा जिंकू शकते. सर्वेक्षणात एआयएडीएमकेलाही येथे जागा मिळताना दिसत नाही. यापूर्वी टाइम्स नाऊ ईटीजीच्या सर्वेक्षणात लोकसभेच्या 39 जागा असलेल्या तामिळनाडूमध्ये भाजपला 2 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर डीएमकेला 21 ते 22 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर काँग्रेसला 5 ते 7 आणि एआयएडीएमकेला 1 ते 3 जागा मिळतील अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment