शिर्डीत कॉंग्रेसला मोठा धक्का, ठाकरेंचे टेन्शन वाढले

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आलीय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मोठा धक्का दिलाय. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेसला राम राम करत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलाय. अकोल्यातल्या कृषी नगर भागातील आंबेडकरांच्या यशवंत भवन निवासस्थानी त्यांचा प्रवेश झाला.

शिर्डीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसच्या महासचिव उत्कर्षा रुपवते यांनी पक्षाच्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसचा ‘हात’ सोडलाय. उत्कर्षा रूपवते काँग्रेसच्या राज्य सचिव महिला आयोगाच्या सदस्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे.

उत्कर्षा रुपवते या काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांची नात तर दिवंगत नेते प्रेमानंद रुपवते यांच्या कन्या आहेत. तर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या त्या निकटवर्तीय आहेत. रुपवतेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने शिर्डीत काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय.

Leave a Comment