शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी अशोक वाकचौरेंचा अर्ज दाखल

शिर्डी – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघात बुधवार, २४ एप्रिल २०२४ रोजी ९ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आज ७ व्यक्तींनी १४ नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली.

शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी बागुल गोरक्ष तान्हाजी (अपक्ष), अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष), ॲड.सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष), अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सतिष भिवा पवार (अपक्ष), संजय पोपट भालेराव (अपक्ष), रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी), राजू शिवराम खरात (बहुजन समाज पार्टी) व उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी)या ९ उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले.

Leave a Comment