संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथून मोठी बातमी समोर आलीय. मांडवे – आश्वी रोडवर सोयाबीनचा ट्रक पलटी झाल्याची घटना शुक्रवार दि. ३ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडलीय. या अपघातात ट्रकचा चालक जखमी झाल्याची माहिती घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी दिलीय.
साकूरहून शिबलापूर कडे ट्रक सोयाबीन घेऊन चालला होता. तो ट्रक बिरेवाडी शिवारातील बोकड्याच्या डोंगराजवळ आला होता. चढा चढत असताना ट्रकमध्ये लोड असल्याने अचानक ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात ट्रकचा चालक जखमी झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
