बाळासाहेब थोरातांची भाजपमध्ये येण्याची इच्छा….

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेब थोरात यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे. ते देशाच्या प्रश्नावर बोलत नाहीत, पक्षाच्या धोरणावर बोलत नाहीत, त्यांचा संपूर्ण वेळ हा विखेंवर टीका करण्यात खर्च होत आहे.

उत्तर महाराष्ट्रात तुम्ही फक्त एक जागा लढवत आहात, ज्या जिल्ह्याचं तुम्ही नेतृत्व करतात त्या जिल्ह्यात एकही जागा तुम्ही लढवत नाही असेही विखे पाटील म्हणाले. आपलं अपयश एकदा मान्य करा असेही विखे पाटील म्हणाले. बाळासाहेब यांची देखील भाजपमध्ये येण्याची इच्छा होती. त्यांच्याही गुप्त बैठका झाल्या होत्या. ती चर्चा का थांबली हे वरिष्ठांना विचारून मी कधीतरी जाहीर करेल असे विखे पाटील म्हणाले.

Leave a Comment