पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ ऑफरवर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले….

नंदुरबार : नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावे आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावे, अशी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली आहे.

आता यावर शरद पवार यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ते नंदुरबार येथील सभेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, आज आपल्या देशात संसदीय लोकशाही पद्धत नरेंद्र मोदी यांच्यामुळे संकटात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल किंवा झारखंडचे मुख्यमंत्र्यांना तुरूंगात टाकण्याची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्या एनडीएमध्ये माझा सहभाग होण्याची भूमिका होऊच शकत नाही.

ज्या व्यक्तीचा, पक्षाचा, त्यांच्या धोरणांचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाही. असा समज आता लोकांमध्ये सुरू आहे. त्यांच्यासोबत राजकीय संबंध माझ्याकडून कधीही होणार नाही. असेही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

गांधी नेहरूंची विचाराधारा आमच्याशी मिळती-जुळती आहे. त्यांची विचाराधारा यांच्यामुळे सामान्य लोकांमुळे. त्यांनी मुस्लिम समाजाचा वेगळा विचार केला. जर आपल्याला देशएकसंध ठेवायचा असेल तर सगळ्या घटकांचा विचार केला पाहिजे. त्यांनी मुस्लिम समाजाच्याबाबत केलेलं विधानामुळे समाजात गैरसमज निर्माण होईल.

अन् नरेंद्र मोदी यांची मागची भाषणं पाहिलीत तर समाजात गैरसमज निर्माण होण्यासाठी पोषक आहेत. ते देशांच्या हितासाठी घातक आहेत. त्यामुळे जे देशाच्या हिताच्या दृष्टीने होईल. त्यांच्यासोबत मी सहभागी होणार नाही. असेही शरद पवारांनी स्पष्ट केलंय.

Leave a Comment