बिग ब्रेकिंग! अरविंद केजरीवाल ऐन प्रचारादरम्यान तुरूंगातून येणार बाहेर..कारण

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या जामिनाची वाट पाहत असलेले मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे..

केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर सर्वोच्च न्यायालयाने आज आपला आदेश दिला असून त्यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ऐन प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर येणार आहेत. त्याच वेळी, ईडीने अंतरिम जामिनाला जोरदार विरोध केला तसेच पुरवणी आरोपपत्रही दाखल केले. याच्या जोरावर ईडीने केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला कोंडीत पकडण्याची संपूर्ण योजना तयार केली होती. ईडी केजरीवाल यांना दारू घोटाळ्यातील मुख्य आरोपी असल्याचं म्हणत आहे.

अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे. आज केवळ पाच मिनिटे सुनावणी झाली आणि प्रतिज्ञापत्रावर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला. केजरीवाल यांच्या निवडणूक प्रचारावर कोणतेही बंधन नाही. मात्र त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार आहे.

Leave a Comment