पुणे(DSNews24/शरद डोंगरे) पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहेय. हवामान खात्याने चार दिवस पुण्यात पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार पुण्यातील विविध परिसरात मुसळधार पाऊस पडतोय. विजांच्या कडाक्यासह पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे.
अचनाक आलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सध्या पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीेचे वारे सुरु आहे. येत्या 13 मेला मतदान होणार आहे. मतदानाला दोन दिवस शिल्लक असल्याने पुण्यात विविध पक्षाकडून सभा आणि रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र अचानक आलेल्या पावसाने प्रचार सभांवर पाणी फेरलं आहे.
सोमवारीदेखील दुपारी तीननंतर शहराच्या काही भागांत हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावल्याने या भागात उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे
