शरद पवार म्हणाले…. छगन भुजबळांकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर…

नाशिक : 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मुख्यमंत्रीपद मिळत होते, पण नेतृत्वाने काँग्रेसला दिले, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रत्युत्तर दिले आहे.

तसेच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबाबत मोठा दावा केला. 2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा प्रश्न नव्हता. कारण ते फारच नवखे होते. तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती, असे त्यांनी म्हटले.

Leave a Comment