आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष :- महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी वेळ घेता येईल. उतावळेपणाने वागण्याची गरज नाही. मुले मदत करतील.

वृषभ :- तुमचा प्रभाव सर्वच ठिकाणी वाढत असल्याचे जाणवेल. कोर्ट-नोकरी-धंद्यात सुधारणा होईल. यश मिळेल.

मिथुन :- घरातील समस्यांमुळे ताण-तणाव होईल. उदास वाटेल. वरिष्ठांच्या बरोबर नम्रतेने बोला. नोकरवर्गाला दुखवू नका.

कर्क :- आजचे काम उद्यावर न टाकता आजच कष्ट घ्या. तुमची कल्पनाशक्ती कौतुकास्पद ठरेल. धंद्यात लाभ होईल.

सिंह :- किरकोळ तणाव होईल. धंद्यात अडचणी येतील. कामाचा व्याप वाढेल. सहकारी मदत करतील. नमते धोरण ठेवावे लागेल.

कन्या :- सामाजिक कार्यात धावपळ केल्याचे समाधान मिळेल. घरात तुमचा विचार सर्वांना पटेल. कर्जाचे काम होईल.

तूळ :- प्रकृतीत सुधारणा होईल. नवीन ओळखी होतील. वरिष्ठ मान-प्रतिष्ठा देतील. कला क्षेत्रात चमकाल. प्रसिद्धी मिळेल.

वृश्चिक :- राजकीय क्षेत्रातील अनुभव उपयोगी पडेल. जुने देणे देता येईल. नवा करार करण्याचे ठरवाल. खरेदी कराल.

धनु :- हिशोब करताना चूक होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचा निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या. धंद्यात नवे काम मिळेल.

मकर :- तुमचे मत सर्वांना पटवून देण्यात तुम्हाला यश येईल. धंद्यातील समस्या संपवण्याची वेळ येईल. महत्त्व मिळेल.

कुंभ :- कला-क्रीडा स्पर्धेत जिंकाल. दूरच्या प्रवासाचा विचार ठरवाल. नोकरीत बदल करण्याची संधी शोधता येईल.

मीन :- तुमच्या कामात बदल करण्याचा विचार कराल. वाहन, जमीन खरेदी करण्याची घाई करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Comment