आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

 

मिथुन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

 

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

कन्या : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

 

तूळ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

 

वृश्‍चिक : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी राहील.

 

धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

 

मकर : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

मीन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.

Leave a Comment